Ad
vv
LIVE
Thu, 20 Aug 2026
--°
Loading...
Maharashtra

महाराष्ट्रात विद्यार्थ्यांना दिला जाणार मूलभूत लष्करी प्रशिक्षण : मंत्री दादा भुसे

मुंबई : महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, शिस्त आणि नियमित व्यायामाची सवय यांचा विकास करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी जाहीर केले…

Jun 3, 2025
2 min read
महाराष्ट्रात विद्यार्थ्यांना दिला जाणार मूलभूत लष्करी प्रशिक्षण : मंत्री दादा भुसे

Photo: The Media Times / Representative Image

T
The Media Times.Live
The Media Times

मुंबई : महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, शिस्त आणि नियमित व्यायामाची सवय यांचा विकास करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी जाहीर केले की, आता राज्यातील विद्यार्थ्यांना पहिलीपासूनच मूलभूत लष्करी प्रशिक्षण दिले जाणार आहे.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय भावना अधिक बळकट होईल, तसेच शारीरिकदृष्ट्या ते अधिक सक्षम आणि सशक्त होतील. लहान वयातच शिस्त आणि संघभावना रुजवणे हे या योजनेमागील मुख्य उद्दिष्ट आहे. अभ्यासक्रमाबरोबरच शारीरिक प्रशिक्षण हेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे मंत्री भुसे यांनी स्पष्ट केले.

विद्यार्थ्यांना या प्रशिक्षणासाठी प्रशिक्षित आणि अनुभवी मार्गदर्शन मिळावे, यासाठी सेवानिवृत्त सैनिकांची मदत घेण्यात येणार आहे. हे सैनिक विद्यार्थ्यांना शिस्त, व्यायाम, प्राथमिक लष्करी नियम व तंत्रे याचे मार्गदर्शन देतील. सेवानिवृत्त सैनिकांमध्ये राष्ट्रसेवेची भावना असतेच, आणि त्यांचा अनुभव या उपक्रमात मोलाचा ठरेल.

या प्रशिक्षणात विद्यार्थ्यांना पथसंचलन, प्राथमिक स्वरूपाचा आत्मसंरक्षण अभ्यास, शारीरिक क्षमता वाढवणारे व्यायाम प्रकार आणि आपत्कालीन परिस्थितीत कसे वागावे याचे शिक्षण दिले जाईल. सुरुवातीला निवडक शाळांमध्ये हा उपक्रम प्रायोगिक तत्वावर राबवण्यात येईल आणि यशस्वी झाल्यानंतर संपूर्ण राज्यात तो विस्तार करण्यात येईल.

मंत्री दादा भुसे यांनी सांगितले की, यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढेल, ते अधिक सजग नागरिक होतील आणि भविष्यात सैन्य, पोलीस किंवा इतर सेवा क्षेत्रात रुजू होण्यासाठी तयार होतील. या निर्णयाचे अनेक स्तरांवर स्वागत होत असून, पालक व शिक्षक देखील याला सकारात्मक प्रतिसाद देत आहेत.

राज्यातील शालेय शिक्षण प्रणालीत हा एक नवा प्रयोग ठरणार असून, लवकरच याची अंमलबजावणी सुरू केली जाईल, असेही भुसे यांनी स्पष्ट केले

RECOMMENDED FOR YOU

"हम अधिकारी बनना चाहते हैं, बस हमें एक शिक्षक दे दो..." छोटी लड़कियों का वीडियो उनकी मांग को पूरा करता है

"हम अधिकारी बनना चाहते हैं, बस हमें एक शिक्षक दे दो..." छोटी लड़कियों का वीडियो उनकी मांग को पूरा करता है

बीड के हिवरपहाड़ी स्कूल के छात्रों ने शिक्षकों की कमी के कारण एक बोतल को माइक्रोफोन के रूप में उपयोग करके एक वीडियो बनाया था और एक शिक्षक की अपील की थी।

The Media Times.Live News Desk
मुंबईकरों के लिए राहत? प्रस्तावित जल कटौती रद्द हो सकती है, मेयर ने दिया अपडेट

मुंबईकरों के लिए राहत? प्रस्तावित जल कटौती रद्द हो सकती है, मेयर ने दिया अपडेट

मुंबई की मेयर रितु तावड़े ने संकेत दिया है कि प्रस्तावित जल आपूर्ति कटौती रद्द की जा सकती है, अंतिम आधिकारिक घोषणा अभी भी प्रतीक्षित है

The Media Times.Live News Desk
मनोज जारांगे पाटिल का बड़ा दावा, कहा- 'जिसे मैंने दोस्त माना वह दुश्मन निकला'

मनोज जारांगे पाटिल का बड़ा दावा, कहा- 'जिसे मैंने दोस्त माना वह दुश्मन निकला'

मराठा आरक्षण आंदोलन के नेता का दावा है कि उन्हें राजनीतिक और सामाजिक रूप से अलग-थलग करने का प्रयास किया जा रहा है, लेकिन उन्होंने उस व्यक्ति का नाम नहीं बताया जिसका वह जिक्र कर रहे हैं।

The Media Times.Live News Desk
Podcast

The Media Times Daily — a 10-minute audio brief.

Hosted by our senior editors, every weekday morning.

Listen now
Video

Explainers, ground reports and long-form documentaries.

Original programming produced by The Media Times.Live studios.

Watch on YouTube