Ad
vv
LIVE
Thu, 20 Aug 2026
--°
Loading...
Entertainment

मोहित सूरीच्या ‘सैयारा’ने केला विक्रम, जागतिक बॉक्स ऑफिसवर पार केला ५०० कोटींचा टप्पा

नवी दिल्ली, ५ ऑगस्ट: दिग्दर्शक मोहित सूरी यांच्या रोमँटिक ड्रामाने ‘सैयारा’ने जगभरात ५०० कोटी रुपयांचा गल्ला जमवून भारतीय चित्रपटसृष्टीत ऐतिहासिक यश मिळवले आहे. या चित्रपटात अहान पांड्या आणि अनीत पड्ढा…

Aug 5, 2025
1 min read
मोहित सूरीच्या ‘सैयारा’ने केला विक्रम, जागतिक बॉक्स ऑफिसवर पार केला ५०० कोटींचा टप्पा

Photo: The Media Times / Representative Image

T
The Media Times.Live
The Media Times

नवी दिल्ली, ५ ऑगस्ट: दिग्दर्शक मोहित सूरी यांच्या रोमँटिक ड्रामाने ‘सैयारा’ने जगभरात ५०० कोटी रुपयांचा गल्ला जमवून भारतीय चित्रपटसृष्टीत ऐतिहासिक यश मिळवले आहे. या चित्रपटात अहान पांड्या आणि अनीत पड्ढा या नवोदित कलाकारांची प्रमुख भूमिका आहे.

यशराज फिल्म्स या निर्मितीसंस्थेने मंगळवारी अधिकृत निवेदनात सांगितले की, “सैयारा हा भारतीय सिनेमाच्या इतिहासातील सर्वाधिक कमाई करणारा प्रेमकथा चित्रपट ठरला आहे.”

यशराज फिल्म्सने निवेदनात म्हटले आहे,

“सैयारामुळे मोहित सूरी यांना त्यांच्या कारकिर्दीतील पहिलं ५०० कोटींचं जागतिक ब्लॉकबस्टर यश मिळालं आहे. तसेच अहान आणि अनीत हे भारतीय सिनेमाच्या इतिहासात ५०० कोटी क्लबमध्ये पदार्पण करणारे पहिले नवोदित कलाकार ठरले आहेत. फक्त १८ दिवसांत या चित्रपटाने एकूण ५०७ कोटी रुपयांची घसघशीत कमाई केली आहे.”

‘सैयारा’ या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. त्यातील संगीत, कथानक, आणि नव्या कलाकारांची फ्रेश केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. मोहित सूरी यांची दिग्दर्शकीय शैली आणि भावनात्मक मांडणी यामुळे चित्रपटाला ही घवघवीत यश मिळालं आहे.

हा चित्रपट नवोदित कलाकारांसाठी एक प्रेरणादायक उदाहरण ठरत आहे आणि बॉक्स ऑफिसवरील यशामुळे यशराज फिल्म्सच्या यशाच्या यादीत आणखी एक नामांकित भर पडली आहे.

RECOMMENDED FOR YOU

पॅरिस फॅशन वीकमध्ये ऐश्वर्या राय बच्चन वळली, रॅम्पवर ग्लॅमरस लूक
मनोरंजन • Sep 29, 2026

पॅरिस फॅशन वीकमध्ये ऐश्वर्या राय बच्चन वळली, रॅम्पवर ग्लॅमरस लूक

बॉलीवूड अभिनेत्रीने L'Oréal Paris' Le Défilé' शोमध्ये रॅम्पवर चालत काळ्या रंगाचा गाऊन आणि मोत्याने सुशोभित केपमध्ये लक्ष वेधून घेतले.

The Media Times.Live News Desk
संगीतकार शंतनू मोईत्रा यांना राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार 2026
मनोरंजन • Sep 29, 2026

संगीतकार शंतनू मोईत्रा यांना राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार 2026

सुगम संगीतातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल मध्य प्रदेश सरकार त्यांचा सन्मान करते; इंदूरमध्ये पुरस्कार सोहळा पार पडला

The Media Times.Live News Desk
एआयच्या गैरवापराच्या विरोधात सलमान खानने कठोर भूमिका घेतली, खोटे व्हिडिओ बनवणाऱ्यांना तुरुंगात टाकले पाहिजे
मनोरंजन • Sep 28, 2026

एआयच्या गैरवापराच्या विरोधात सलमान खानने कठोर भूमिका घेतली, खोटे व्हिडिओ बनवणाऱ्यांना तुरुंगात टाकले पाहिजे

अभिनेत्याने बनावट एआय व्हिडिओ आणि अनधिकृत व्हॉइस डबिंग ही एक गंभीर समस्या असल्याचे म्हटले आणि गैरवापराच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची आवश्यकता यावर जोर दिला.

The Media Times.Live News Desk
Podcast

The Media Times Daily — a 10-minute audio brief.

Hosted by our senior editors, every weekday morning.

Listen now
Video

Explainers, ground reports and long-form documentaries.

Original programming produced by The Media Times.Live studios.

Watch on YouTube