Ad
vv
LIVE
Thu, 20 Aug 2026
--°
Loading...
Politics

खरगेंचा पंतप्रधानांना पत्र – लोकसभा उपाध्यक्ष पदाच्या निवडीची प्रक्रिया त्वरीत सुरू करण्याची मागणी

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून लोकसभा उपाध्यक्ष पदाच्या निवडीची प्रक्रिया तात्काळ सुरू करण्याची मागणी केली आहे.…

Jun 10, 2025
1 min read
खरगेंचा पंतप्रधानांना पत्र – लोकसभा उपाध्यक्ष पदाच्या निवडीची प्रक्रिया त्वरीत सुरू करण्याची मागणी

Photo: The Media Times / Representative Image

T
The Media Times.Live
The Media Times

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून लोकसभा उपाध्यक्ष पदाच्या निवडीची प्रक्रिया तात्काळ सुरू करण्याची मागणी केली आहे.

खरगेंनी आपल्या पत्रात नमूद केले की, मागील 17व्या लोकसभेच्या कार्यकाळात एकही उपाध्यक्ष निवडला गेला नव्हता, ही बाब अत्यंत गंभीर आणि लोकशाही मूल्यांसाठी अपमानास्पद होती. त्यांनी असेही सांगितले की, 18व्या लोकसभेच्या प्रारंभालाही अद्याप उपाध्यक्ष पद रिक्त आहे, हे खेदजनक आहे.

खरगेंनी यावेळी संविधानाच्या तरतुदींचा हवाला देत सांगितले की, लोकसभेचे उपाध्यक्ष हे संसद कार्यवाहीच्या गतीशीलतेसाठी अत्यंत आवश्यक असते. सभापती अनुपस्थित असताना उपाध्यक्ष सभेचे संचालन करतात, त्यामुळे ही जबाबदारी लांबणीवर ठेवणे योग्य नाही.

खरगेंच्या मते, संसद ही लोकशाही व्यवस्थेचा केंद्रबिंदू असून तिच्या प्रत्येक पदावर योग्य वेळी नियुक्ती होणे आवश्यक आहे. यासाठी त्यांनी पंतप्रधान मोदी यांना विनंती केली की, लवकरात लवकर या पदासाठी निवडणुकीची अधिसूचना जारी करावी.

ही मागणी संसद आणि लोकशाही प्रक्रियेच्या सुदृढतेसाठी महत्त्वाची मानली जात आहे. आता पंतप्रधान यावर काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RECOMMENDED FOR YOU

"बांगलादेशी घुसखोर आणि मृत मतदार तुमचेच होते का?" एसआयआरवरील प्रश्नांवर संजय निरुपम यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला
राजकारण • Sep 29, 2026

"बांगलादेशी घुसखोर आणि मृत मतदार तुमचेच होते का?" एसआयआरवरील प्रश्नांवर संजय निरुपम यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला

मुंबई : निवडणूक आयोगाच्या स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन (एसआयआर) प्रक्रियेवर काँग्रेस आणि विरोधी पक्ष सातत्याने प्रश्न उपस्थित करत आहेत. दरम्यान, शिवसेनेचे प्रवक्ते संजय निरुपम यांनी काँग्रेसच्या आरोपांवर जोरदार प्रहार करत एसआयआरचा बचाव केला आहे.

The Media Times.Live News Desk
यूपी निवडणूक बझ: काँग्रेस-एसपी सीट शेअरिंग आणि रॅली योजना गतिविधी, शिवपाल यादव यांनी मैनपुरी-सैफाई कार्यक्रमावर प्रतिक्रिया दिली
राजकारण • Sep 28, 2026

यूपी निवडणूक बझ: काँग्रेस-एसपी सीट शेअरिंग आणि रॅली योजना गतिविधी, शिवपाल यादव यांनी मैनपुरी-सैफाई कार्यक्रमावर प्रतिक्रिया दिली

मैनपुरी आणि सैफई येथे काँग्रेसच्या संभाव्य रॅलीभोवती चर्चा वाढत असताना काँग्रेस आणि समाजवादी पक्ष यांच्यातील जागावाटप आणि संयुक्त रॅलींबाबत चर्चा सुरूच आहे.

The Media Times.Live News Desk
राष्ट्रवादीचे (एसपी) कोणत्याही संघटनेत विलीनीकरण करणे शरद पवारांनी नाकारले, पक्षाचा पाया मजबूत करण्यावर भर राहील
राजकारण • Sep 27, 2026

राष्ट्रवादीचे (एसपी) कोणत्याही संघटनेत विलीनीकरण करणे शरद पवारांनी नाकारले, पक्षाचा पाया मजबूत करण्यावर भर राहील

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) प्रमुखांनी विलीनीकरणाबाबतची अटकळ नाकारली आणि पक्ष आपली स्वतंत्र राजकीय ओळख कायम ठेवेल असे म्हटले आहे.

The Media Times.Live News Desk
Podcast

The Media Times Daily — a 10-minute audio brief.

Hosted by our senior editors, every weekday morning.

Listen now
Video

Explainers, ground reports and long-form documentaries.

Original programming produced by The Media Times.Live studios.

Watch on YouTube