Ad
vv
LIVE
Thu, 20 Aug 2026
--°
Loading...
Sports

निकोलस पूरनने 29 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली

पोर्ट ऑफ स्पेन, 10 जून – वेस्ट इंडीजचा धडाकेबाज डावखुरा फलंदाज निकोलस पूरनने केवळ 29 वर्षांच्या वयात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करून क्रिकेटविश्वात खळबळ उडवून दिली आहे. पूरनने आपल्या सोशल…

Jun 10, 2025
1 min read
निकोलस पूरनने 29 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली

Photo: The Media Times / Representative Image

T
The Media Times.Live
The Media Times

पोर्ट ऑफ स्पेन, 10 जून – वेस्ट इंडीजचा धडाकेबाज डावखुरा फलंदाज निकोलस पूरनने केवळ 29 वर्षांच्या वयात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करून क्रिकेटविश्वात खळबळ उडवून दिली आहे. पूरनने आपल्या सोशल मीडियावरून ही घोषणा केली असून त्याने निवृत्तीच्या निर्णयामागचं कोणतंही स्पष्ट कारण दिलेलं नाही.

पूरन म्हणाला, “मी हा निर्णय बराच काळ विचार केल्यानंतर घेतला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये माझं योगदान देताना मी नेहमीच अभिमानाने खेळलो. संघासाठी दिलेली कामगिरी आणि चाहत्यांकडून मिळालेलं प्रेम मी कधीही विसरणार नाही.”

या निर्णयापूर्वी पूरनने इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या टी20 मालिकेसाठी स्वतःला अनुपलब्ध जाहीर केलं होतं, त्यामुळे त्याच्या निवृत्तीच्या शक्यता आधीपासूनच व्यक्त केल्या जात होत्या.

निकोलस पूरनने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 29 एकदिवसीय सामने आणि 88 टी20 सामने खेळले. त्याने टी20 मध्ये आक्रमक शैलीत अनेक विस्मयकारक खेळी साकारत क्रिकेटप्रेमींच्या मनात आपली खास छाप सोडली. त्याचा आघाडीचा फलंदाज म्हणून संघात मोठा वाटा होता.

पूरनची आकस्मिक निवृत्ती वेस्ट इंडीजसाठी धक्कादायक असली, तरी तो आगामी काळात विविध टी20 लीगमध्ये खेळत राहणार आहे. आयपीएलसारख्या मोठ्या लीगमध्ये त्याला अजूनही मोठी मागणी आहे. क्रिकेटप्रेमींनी त्याच्या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केलं असून त्याच्या पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

RECOMMENDED FOR YOU

शोएब अख्तरला PCB मध्ये मोठी जबाबदारी मिळू शकते, इंग्लंड दौऱ्यानंतर बदल अपेक्षित
क्रीडा • Sep 29, 2026

शोएब अख्तरला PCB मध्ये मोठी जबाबदारी मिळू शकते, इंग्लंड दौऱ्यानंतर बदल अपेक्षित

लाहोर: पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) आपल्या क्रिकेट संघात आणि संबंधित धोरणात्मक रचनेत बदल करण्याच्या तयारीत आहे. दरम्यान, पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरला बोर्डात महत्त्वाची जबाबदारी देण्यात आल्याची चर्चा सुरू झाली आहे.

The Media Times.Live News Desk
एका शॉटमध्ये तिची सोन्याची किंमत आहे… पाच शूट-ऑफनंतर ईशा सिंगने रौप्यपदक जिंकले
क्रीडा • Sep 28, 2026

एका शॉटमध्ये तिची सोन्याची किंमत आहे… पाच शूट-ऑफनंतर ईशा सिंगने रौप्यपदक जिंकले

ईशा सिंगने महिलांच्या २५ मीटर पिस्तूल वैयक्तिक स्पर्धेत रौप्यपदक मिळवले, तर मनू भाकरचे पदक हुकले.

The Media Times.Live News Desk
राजस्थान रेंजर्सने नवीन अध्याय सुरू केला, आरएपीएल ग्रुपने संघ ताब्यात घेतला; सानिया मिर्झा ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्त
क्रीडा • Sep 27, 2026

राजस्थान रेंजर्सने नवीन अध्याय सुरू केला, आरएपीएल ग्रुपने संघ ताब्यात घेतला; सानिया मिर्झा ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्त

RAPL ग्रुपने आठव्या हंगामापूर्वी टेनिस प्रीमियर लीग संघाचा ताबा घेतला आहे, सानिया मिर्झा हा नवीन चेहरा म्हणून सामील झाला आहे.

The Media Times.Live News Desk
Podcast

The Media Times Daily — a 10-minute audio brief.

Hosted by our senior editors, every weekday morning.

Listen now
Video

Explainers, ground reports and long-form documentaries.

Original programming produced by The Media Times.Live studios.

Watch on YouTube