पुणे, : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या “या, मारा मला!” या वादग्रस्त विधानावरून पुण्यात जोरदार प्रतिक्रिया उमटली आहे. शहरभरात लावण्यात आलेल्या पोस्टरांमधून उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे.
ही पोस्टरबाजी शिवसेना शिंदे गटाचे पुणे शहरप्रमुख प्रमोद भांगिरे यांच्या वतीने करण्यात आली असून, त्यात म्हटलं आहे – “ते वक्तव्य करण्यात व्यस्त आहेत, आम्ही मात्र काम करण्यात व्यस्त आहोत.”
ही पोस्टर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात दिलेल्या भावनिक वक्तव्यानंतर लावण्यात आली आहेत. त्यांच्या विधानाला विरोधकांनी राजकीय नाट्य आणि सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे.
पुण्यातील विविध भागांमध्ये हे पोस्टर्स झळकत असून, त्यावरून शिवसेनेतील दोन गटांमधील संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
राजकीय वर्तुळात ही पोस्टरबाजी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक सशक्त संदेश मानली जात आहे. आगामी महापालिका निवडणुकांमध्ये दोन्ही गटांकडून आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
शहरात यामुळे राजकीय वातावरण तापले असून, पुढील काही दिवसांत दोन्ही गटांमध्ये यावरून आणखी टीका-प्रत्यटीकेची शक्यता आहे.


